Posts

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
जीवनाची वाढलेली (पण न कळणारी) किंमत "सध्याचे हे सारे जे सुरु आहे ना याबद्दल मला विचाराल तर थोडक्यात मी याचा उलगडा करुन देते... झालं असं आहे की सध्या प्रत्येक माणसाच्या जीवनाची किंमत वाढली आहे आणि सोबतच ती त्याला जाणवायलाही लागली आहे. शिक्षणामुळे, बदलत्या वातावरणामुळे, रोज नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधींमुळे प्रत्येकाला आपल्यातल्या स्वतः ला भेटण्याची संधी मिळते, त्या निमित्ताने आपल्या स्वतःला काय आवडते काय नावडते याबद्दल विचार करता येतो व त्यानुसार जीवनाची दिशा ठरविण्याची मुभा असल्याने हा सगळा स्वतंत्रतेचा आविष्कार बघायला मिळतो. आपल्याच जीवनाची किंमत वाढलेली जेव्हा आपल्याला कळते तेव्हा त्या किंमतीनुसार माणूस वागणे सुरु करतो, ती किंमत जपण्याचाही प्रयत्न करतो आणि वारंवार ती किंमत इतरांच्या मनावर वेगवेगळ्या उपाययोजनांनी ठसविण्याचाही प्रयत्न करतो. आता या सगळ्या प्रकारात गंमत अशी आहे की एका बाजूने माणसाला माणसाची किंमत कळणे व त्यानुसार त्याच्या जीवनाची वाटचाल होणे या दोन्ही बाबी सत्यतेच्या निकषावर एकमेकांना पुरक ठरु शकतात व चांगल्या प्रकरची स्वाभीमानी व्यक्तिमत्वे तयार झालेली आपल्या...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
वाय + झेड = वायझेड माझं वय असं आहे की ना धड मला स्वतःला तरुण म्हणविता येत ना धड मध्यवयीन. तरुण म्हणावे तर तरुण लोक करतात त्या गोष्टी मला आगाऊपणाच्या व वाह्यातपणा वाटतात. पण मग सरळ मध्यमवयीन हे बिरुद देखील स्विकारायला मन धजावत नाही कारण एखादी वीशीतली पोरगी काका म्हणते तेव्हा मनात वेदना होतात. काका म्हणण्यापेक्षा लादेन किंवा दाऊद म्हणले तरी चालेल असे त्या पोरीला म्हणावे वाटते. माझं अद्याप लग्न झालेले नाही, लग्न करण्याची इच्छा तर आहे पण मी लग्नासाठी परफेक्ट मटेरीयल नाही असे मला वाटायला लागले आहे. मी नक्की काय करतोय किंवा मला काय करायचंय हेच मला कळत नाहीये.... वायझेड या नव्या मराठी चित्रपटातील तेहेतीस वर्षांचा नायक स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला सांगत असतो. हा नायक स्वतः वाय जनरेशनचा सदस्य आहे. वाय जनरेशन म्हणजे साधारण १९७१ ते १९९५ दरम्यान जन्म झालेली पिढी. या पिढीचे, तिच्या मानसिकतेचे व तिच्या स्वभावगुणांचे हा नायक प्रतिनिधित्व करीत असतो. संपुर्णपणे गोंधळून गेलेला. मोठ्या वयाच्या मित्रांमधे जाण्यास टाळणारा व तरुणांच्या म्हणजेच झेड जनरेशनच्या वेगात भांबावून जाणारा असा हा वाय जनरेशन...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
पोटचा गोळा तब्बल चार वर्षांनंतर सुनिलच्या घरात बाळाची चाहुल लागली. घरात येणाऱ्या बाळाच्या लडीवाळ अस्तित्वाच्या स्वप्नांनी सुनिल व त्याच्या पत्नीचे जग व्यापून गेले. अपत्य नसल्याने गेली चार वर्षे त्या दोघांचे क्षणाक्षणाला वाढत जाणारे दुःख आम्हा सर्वांनाच जाणवित होते. वहिनी तर जणू हसणेच विसरली होती. मातृत्व ही स्त्रीची सर्वात मोठी ओळख असते व त्यामुळेच तिला पुर्णत्व प्राप्त होते अश्या विचारांना उराशी बाळगणारी ती असल्याने आपण अपूर्णच आहोत अशी तिला सारखी टोचणी लागलेली असायची. बाळ दत्तक घेऊनही मातृत्व चांगल्या प्रकारे निभावता येतं हे तिच्या शिक्षित बुद्धीमत्तेला पटत होते परंतू त्याने तिच्या भावनिक मनोभुमिकेची समजूत घातली जात नव्हती. वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटस् घेतल्यानंतर मात्र जेव्हा तिला तिच्या पोटच्या गोळ्याची चाहूल लागली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या बाळाच्या केवळ आगमनाच्या चाहुलीने सुनिल व वहिनीचे जगच बदलून गेले. डॉक्टरांनी जितकी काळजी घ्यायला सांगितली त्यापेक्षा जवळपास दहापट जास्त तिची स्वतःची काळजी घेणे सुरु झाले. सुनिलचे देखील तिच्याकडे पूर्ण लक्...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
स्वच्छ व पारदर्शी दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या एका महाविद्यालयामधे मला प्राध्यापक पदाच्या मुलाखती घेण्यासाठी विषयतज्ञ म्हणून बोलाविण्यात आले होते. उच्चशिक्षण प्रक्रीयेमधे मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांपैकी हे एक महाविद्यालय आहे. मला त्या महाविद्यालयात विषयतज्ञ म्हणून मुलाखतींकरीता जाण्याची बरेच वेळा संधी मिळाली. प्रत्येकवेळी मला तेथे जाणविलेली स्वच्छ व पारदर्शी प्रक्रीया मनाला सुखावून जाते. दोन वर्षापूर्वी एका प्रक्रीयेत सहभागी झाल्याचे व त्यावेळी केलेल्या कर्तव्याचे फलीत मला नुकतेच अनुभवायला मिळाले. मी सहभागी झालेल्या प्रक्रीयेचा दोन वर्षांनतरचा परीणाम माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला फारच आनंद व समाधान देणारा होता. त्या आनंदाला कारणीभूत ठरलेली त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य मॅडमने नुकतीच दिलेली उत्स्फुर्त प्रतिक्रीया फारच मोलाची होती. चांगले काम केल्याची अशी पावती आपल्याला बरेचवेळा आणखी चांगले कार्य करण्याची नवी उमेद देऊन जाते. मला माझ्या छोट्याश्या परंतू प्रमाणिकपणे केलेल्या कामाचा आनंद तर होत होताच परंतू ती प्रक्रीया राबविणाऱ्...

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
संवेदनशील मन आठव्या वर्गात गेलेल्या त्या लहानग्याचे आजोबा त्याला उन्हाळ्यात सोडून गेले. गेले अनेक दिवस त्याचे आजोबा आजारी होते. एक दुर्धर आजार झाला होता त्यांना. त्या आजारामुळे त्यांना फार त्रास व्हायचा. बरेच वेळा दवाखान्यात न्यावे लागायचे. आजारामुळे आजोबा कायम घरीच असायचे व या लहानग्याला त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाची खूप सवय झाली होती. शाळेतून आल्यावर आजोबांशी शाळेतील गंमती जमती बद्दल गप्पा मारणे, रात्री आजोबांसोबत बसून त्यांच्याकडून गोष्टी ऐकणे, आजोबा पलंगावरच असल्याने त्यांना काही लागले तर बघणे, शाळेत जाताना आजोबांना मस्तपैकी बाय आबा म्हणून जाणे असा त्याचा दिनक्रम होता. आजारी असले तरी आजोबा आपल्या घरातील महत्वाची व्यक्ती आहेत हे त्याला सतत जाणवायचे. याचे कारण घरातील सर्व जण आजोबांची खूप काळजी घ्यायचे. विशेषतः या बाळाचे आई वडील त्यांना फार जपायचे. आपल्या आजोबांसाठी आपले आई वडील कसे झटतात हे तो पोरगा बघत असायचा. आजोबांचे पाय चेपून देणे, आजोबांना दवाखान्यात नेणे, त्यांची औषधे आणणे, त्यांच्याजवळ दवाखान्यात बसून राहणे, त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करुन खाऊ घालणे, त्यांची सेवा करणे ...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

गुरु प्रतिष्ठा आपल्या देशातील कुणालाही गुरु महात्म्य समजावून सांगावे लागत नाही कारण गुरु शिष्य परंपरांच्या आधारेच या देशाच्या विचार क्षमतेचा व क्रीयाशीलतेचा आधार तयार झालेला आहे. प्राचीन काळात तर गुरु शिष्य परंपरा ही सर्वात थोर अशी व्यवस्था मानली जायची. या प्रक्रीयेमधील केंद्रस्थानी असलेला गुरु सर्वश्रेष्ठ मानल्या जायचा व गुरुचे स्थान समाजामधे अतिशय उच्च दर्जाचे होते. अत्यंत विद्वान असणारे हे गुरु सामाजिक व राजकीय व्यवस्थांमधेही आपले महत्व टिकवून होते. राजाच्या दरबारात राजाने आपल्या सिंहासनावर गुरुला बसवून त्याचा सन्मान करणे यापेक्षाही महत्वाचे म्हणजे राज्य कारभारातील महत्वाच्या निर्णयांमधे गुरुचे मत ग्राह्य धरले जायचे. त्यांच्या निरपेक्ष वृत्तीचा व तटस्थ निर्णय क्षमतेचा समाजाला फायदाच व्हायचा. निर्णय प्रक्रीयेमधे गुरुंना स्थान दिल्यामुळे समाजात गुरुंकडे बघण्याची दृष्टी सन्मानाची व आदराची होती. गुरुंना सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या ज्ञानाच्या आधारे आपल्या जीवनाचा सकल विकास होतो ही बाब सर्वदूर स्विकारल्या गेल्यामुळे गुरुंना कायमच आपल्या समाजात उच्च दर्जा प्राप्त झाला होता. गुरु या पदाचे...

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
अदरकवाली चाय पावसाचे चिंब ओले दिवस..पावसाच्या आगमनाने पायथ्यापासून तो माथ्यापर्यंत हिरवागार झालेला अभेद्य रायगड.. रायगडावरचे ते सुंदर टुमदार रेस्ट हाऊस..त्या रेस्ट हाऊसच्या समोर टाकलेल्या दोन खुर्च्या..त्यावर बसलेले दोन मित्र..पाऊस पडून गेल्याने आता धुक्याचा अंमल सुरु झालेला..वातावरणात रागडावर सुटणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे बोचरा पण सुखद गारवा..दोन्ही मित्रांचा आवडता कवी गुलज़ार आणि त्याच्या कवितांचे वाचन..त्यामधील भन्नाट कवीकल्पना दोघांनाही कळल्यामुळे व मनाला भिडल्यामुळे एकाच वेळी निघालेले - क्या बात है यार!..एखाद्या कवितेच्या वाचनानंतर अचानक विचारांमधे गर्क होऊन रायगडाच्या त्या विलोभनीय शांततेशी एकरुप होण्याचा प्रयत्न..त्या शांततेचा गुंजारव अनुभवण्याचा प्रयत्न..अचानक मेहंदी हसनची आठवण..मित्राच्या आग्रहाखातर रंजीश ही सही चे गायन..त्याच्या - माना के महोब्बत का छुपाना है महोब्बत, चुपकेसे किसी रोज़ जताने के लिये आ - या ओळीला दिली जाणारी एकत्रीत दाद..जिवलग मैत्री असल्याने संवादाचे विषय सारखेच..गप्पांच्या ओघात मग रागडावरील त्या सायंकाळी महाराजांचेही स्मरण..मग बाबासाहेब पुरंदरे व शिवकल्याण र...