Posts

Showing posts with the label क्षण गेला…

थोडा है थोडे की जरुरत है @ 16.05.23

Image
क्षण गेला … गाडी स्टेशनवर १५ मिनीटे थांबणार होती . त्याने तिला सांगितले होते , तू नक्की ये मला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे . असे काहीतरी जे मी फोनवर सांगूच शकणार नाही . परंतू सांगायचे आहे कारण त्यावर आपल्या नात्याचे भविष्य अवलंबून आहे . फार गरजेचे आहे . ती गोष्ट मला तुला प्रत्यक्ष समोरासमोर सांगायची आहे . तो तिला सोडून जाणार ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती . एक तर जाणार होता , परंतू जाण्याआधी तिच्यासाठी वेळ पण काढला नाही . आपल्याच कामात गर्क राहीला . तिला त्याचा भयंकर राग आला होता . पण त्याचे म्हणणे टाळणे तिला कधी जमलेच नव्हते . शिवाय तो महत्वाचे काहीतरी बोलणार होता . त्यामुळे ती धावपळ करत स्टेशनवर पोहोचली . तो चातकासारखी वाट बघत होता . गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती पण ती मात्र पोहोचली नव्हती . त्याने डब्यात सामान ठेवले व तो तिची वाट बघत राहीला . तेवढ्यात ब्रीजवरून ती धावत येताना दिसली . त्याच्या भेटीच्या ओढीने तिने केस देखील बांधले नव्हते . हातात पर्स घेऊन तो ...