Posts

Showing posts with the label स्पर्श (१)

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23

Image
स्पर्श .. ( १ ) वाचक मंडळी , मी आज एका अतिशय संवेदनशील विषयावर लिहीत आहे . सदर विषय दोन भागांमधे लिहीला आहे . असल्या विषयांसंदर्भात अजूनही आपल्या समाजात बोलले जात नाही ही मोठी खंत आहे . आपण सर्वांनी याबाबत विचार करावा व जमेल त्या पद्धतीने ही समस्या कमी होईल याबाबत प्रयत्न करावा ही विनंती . सदर विषयावर मी काहीतरी लिहावे असे माझी मैत्रीण प्राची पालकर हिने मला सुचविले . त्याक्षणी मला महाविद्यालयात घडलेली एक घटना आठवली . वर्णन केलेली घटना मागच्या वर्षीची आहे . खरे तर मला देखील हा विषय मांडायला उशीरच झाला आहे , त्याबद्दल क्षमस्व . सर , माझ्या मुलीचे नाव तुमच्या कॉलेजमधून नाव काढायचे आहे . आता मला माझ्या मुलीला शिकवायचे नाही . माझ्यासमोर माझ्या केबीनमधे एका मान खाली घालून बसलेल्या मुलीची तिच्या सोबत आलेली आई मला हे सांगत होती . एखादी विद्यार्थिनी असे महाविद्यालयातून नाव काढत असेल तर स्वाभाविकपणे मी स्वतः पूर्ण चौकशी करूनच तशी परवानगी देत असतो . मी त्यांना काय अडचण ...