Posts

Showing posts from April, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
प्रोफेशनॅलीझम चांगली नोकरी, भरपूर पगार तसेच सर्व सुखे दाराशी लोळण घालीत असलेल्या माझ्या एका मित्राच्या तोंडचे एक वाक्य ऐकून मी अचानक चमकलो. अनेक दिवसांनंतर आम्ही कनिष्ठ महाविद्यालयात सोबत शिकणारे बरेच मित्र मैत्रीणी एकमेकांना भेटलो होतो. साधारण असल्या कार्यक्रमांमधे सर्वात आधी एकमेकांचा नव्याने परीचय करुन देण्याची पद्धत असते. त्यानुसारच प्रत्येकजण आपला परीचय देत होता. सर्वसाधारणपणे सर्वांनी आपल्या परीवाराचा परीचय, नोकरीबाबतची माहिती व अन्य काही महत्वाच्या घडामोडी असा ढाचा अवलंबीला होता. सुनिलने मात्र स्वतःचा परीचय देताना त्याला मिळत असलेल्या पॅकेजपासून सुरुवात केली. तो कसा अत्यंत यशस्वी व श्रीमंत आहे हे सांगण्याचा व भासविण्याचा भरपूर प्रयत्न त्याने केला. एव्हडे बोलून तो थांबला नाही तर पुढे त्याने तो यशस्वी कसा झाला याचा मंत्र देखील आम्हा सर्वांना सांगितला. त्याबाबतच बोलता बोलता तो बोललेल्या एका वाक्याने मी जरा विचारात पडलो. तो म्हणाला माझ्या यशाचा एकच मंत्र आहे.. प्रोफेशनॅलीझम. माझे प्रत्येक काम, प्रत्येक विचार, प्रत्येक नाते प्रोफेशनलच असते, मी कधीही त्यात भावनांची सरमिसळ होऊच देत न

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मुस्कुराने के कर्ज अनेक वर्षांनंतर मीराला तब्बल दहा दिवसांची सुटी मिळणार होती. दहा दिवस ती त्या घरापासून दूर, घरातील माणसांपासून दूर एकटी आणि एकटी राहणार होती. जेथे ती जाणार होती तेथे कुणीही तिच्या परीचयाचे नव्हते. तेथेही जास्तीत जास्त वेळ एकटे राहण्यात व स्वतःशी संवाद साधण्यात जाणार होता. तसे बघितले तर आयुष्यात पहिल्यांदाच ती अश्याप्रकारे सर्वकाही सोडून जाणार होती. त्या शिबीराचे पत्रक जेव्हा तिच्या हातात आले तेव्हा त्यातील दोन शब्दांनी तिच्या मनाला स्पर्श केला.. ते शब्द होते - शोध स्वतःचा. खरोखरीच घरच्या जबाबदारींचे निर्वहन करता करता मीरा स्वतःला हरवून गेली होती. त्यामुळेच तिने त्या शिबीराला जाण्याचा निर्णय घरी जाहीर केला. तो निर्णय ऐकल्यावर तिला अपेक्षित तीव्र प्रतिक्रीया उमटल्याच. कारण त्या घराला चालविणारी व घरातील प्रत्येकाच्या जीवनाचा आधार असलेली मीरा दहा दिवस नसणार ही कल्पनाच कुणाला करवत नव्हती. तरुण अल्लड वयातील तारुण्यसुलभ भावनांसोबत जीवनाची जबाबदारी मीरावर कधी येऊन पडली हे तिला कळलेच नाही. पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर लगेचच बँकेची परीक्षा देऊन मीरा नोकरीला लागली. त्या बँके

My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
आंदोलन दहा वर्षांपूर्वीची गोष्ट... सकाळी साधारण पाच वाजता दवाखान्याच्या त्या बाकड्यावर झोपलेल्या मनोहरला नर्स उठवायला आली. पहाटे पहाटे त्याला गाढ झोप लागली होती. रात्री अंदाजे तीन वाजेपर्यंत तो जागाच होता. त्याची आई दवाखान्यात क्रीटीकल केअर युनीटला भरती होती. रात्री दोन तीन वेळा तो आईला बघून आला होता. आईचे असे रुप त्याला बघवत नव्हते. वेगवेगळ्या नळ्या लागलेल्या, वेगवेगळी यंत्रे लागलेली. अचानकच आईला त्रास झाला आणि दवाखान्यात भरती करावे लागले. इतक्या सकाळी डॉक्टरांनी बोलाविले म्हणल्यावर मनोहर जरा काळजीत पडला होता. त्या विशेष कक्षामधे तो गेला तेव्हा डॉक्टर आईच्या बेडजवळ उभे राहून तिला तपासत होते. चेहेरा गंभीर होता. मनोहर आईच्या बेडपर्यंत पोहोचल्यावर डॉक्टरांनी आईची तब्येत अजून खालावल्याचे त्यांनी त्यांस सांगितले. तेथील यंत्रांवरची वेगवेगळी रीडींग त्यांनी मनोहरला दाखवून आईच्या तब्येतीच्या स्थितीबद्दल अवगत केले. खरे तर मनोहरला त्यातील काहीच कळले नाही. डॉक्टरांचे शेवटचे एकच वाक्य त्याला नीट ऐकू आले, यांना आता नागपूरला हलविल्याशिवाय पर्याय नाही. त्वरीत आईला नागपूरला नेण्याचा त्याने निर्णय घे

My article published in Hindusthan daily today uner my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
वडील नावाचे छत.. होळीचा दिवस. सुधाकर आपल्या मुलाला घेऊन बाजारामधे गेला. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळमाती असली तरी ती होळीच्या दिवशी संध्याकाळपासूनच अनेकांच्या अंगात येत असते. त्यामुळे बाजारात तोबा गर्दी होती. भाजी आणण्यासाठी मुलाला त्या बाजारात फिरविण्यापेक्षा त्याला कुठेतरी बसवून द्यावे व आपण भरभर भाजी घेऊन यावी असा विचार सुधाकरने केला. त्याच्या कार्यालयात येणाऱ्या एका फळ विक्रेत्याजवळ एका छोट्या स्टुलवर त्याने त्याच्या चार वर्षांच्या मुलाला, राजूला बसविले. त्याच्या हातात फुटाण्याचा पुडा देऊन सुधाकर बाजारहाट करायला निघाला. त्या फळ विक्रेत्यानेही त्याला जायला सांगितले - साब, आप जाईये, हम बच्चे का खयाल रखेंगे. सुधाकर बाजाराच्या आत पोहोचत नाही तोच नेमका विद्युत पुरवठा खंडीत झाला. बाजारात गर्दी, लोकांची धावपळ आणि त्यात सगळीकडे अंधार झाला. लवकर लवकर भाजी घेऊन घरी जाऊया असा विचार त्याच्या मनात आला. नेहमीप्रमाणे सावकाश प्रत्येक भाजी नीट बघून, निवडून आणण्याची त्याची नेहेमीची सवय त्याने बाजूला ठेवली आणि पटापट भाजी विकत घेतली. मनात कुठेतरी राजूचा विचार होताच. लहानसे पोर तेथे बसून वाट बघत असेल अ