थोडा है थोडे की जरूरत है @07.11.17
चांगुलपणाचे राजदूत रोजचे वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर मला एक बाब फार प्रकर्षाने जाणवते . इतक्यात बातम्या वाचत असताना जास्तीत जास्त बातम्या या नकारात्मक दिशेने जाताना आढळतात . अनियमितता , भ्रष्टाचार , आतंकवाद , मोर्चे , आंदोलने , बंद , संप , वादविवाद , जातीवाचक वाद , अपघात या आणि असल्या अनेक बातम्यांनी वर्तमानपत्र भरलेले असते . वर्तमानपत्र हा समाजाचा प्रत्यक्ष आरसा असतो असे मानल्यास हे सारे नकारात्मक चित्र आपल्याला खिन्न करायला लागते . परंतू मग परत एक मुलभूत प्रश्न मनात येतो … आपल्या सभोवताली इतक्या नकारात्मक बाबी घडत असताना व या सर्व नकारात्मक बाबींचा नकळतपणे आपल्याही मनावर परीणाम होत असताना देखील हे जग सुरु कसे आहे ? या जगाचे रहाटगाडगे बऱ्यापैकी सुरु राहते . या सर्व नकारात्मक घडामोडींनी विषण्ण झालेले मन परत नव्या उभारीने नव्या दिवसाच्या स्वागतासाठी का तयार होते ? याचे उत्तर मला लाभते या जगात या सर्व नकारात्मकतेच्या पार्श्वभूमीवर शांतपणे कोणताही गाजावाजा न करता कधी कधी अव...