Posts

Showing posts with the label सकस वैचारिकतेकडे

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.03.22

Image
सकस वैचारिकतेकडे … सध्या देशात कश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे . सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पोस्ट वाचायला मिळत आहेत . त्यानिमीत्ताने संपुर्ण समाजमन ढवळून निघत आहे . चित्रपटाबद्दल मी आज भाष्य करणार नाही कारण याबद्दलचे विचार व्यक्त करावे किंवा करु नये या संबंधातही प्रतिक्रीया उमटत आहेत . व्यक्तिशः सांगायचे झाल्यास आम्ही एकूण २० जण चित्रपट बघायला गेलो होतो . एरवी गंमत , मजा , मस्ती करत धमाल करणारे आम्ही सर्व , चित्रपट संपल्यावर एकमेकांशी एकही शब्द न बोलता आपापल्या घरी परतलो . काहीच व्यक्त होऊ नये अशी स्थिती सर्वांचीच झाली होती . आम्हा सर्वांचे असे शांत राहून घरी निघून जाणेच एक मोठी प्रतिक्रीया होती . मला मात्र या सबंध प्रक्रीयेमधे एक नवा आशेचा किरण दिसतोय . तो म्हणजे आपल्या देशाची आता सकस वैचारिकतेकडे वाटचाल सुरु झाली आहे . सोशल मिडीयाचा यामधे मोठा सहभाग आहे . अनेकांना व्यक्त होण्याची संधी या निमीत्ताने मिळतेय व देशात किंवा जागतिक पातळीवरदेख...