Posts

Showing posts from May, 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 05.05.2020

Image
तेरी मेरी कहानी है ... एका मोठ्या कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर समोर बसलेल्या होत्या . संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते . आणि लता दिदींसमोर त्यांनी गायलेली गाणी नव्या पिढीचे गायक गात होते . परंतू या संपुर्ण कार्यक्रमात मधेच एका गायकाने गायलेल्या एका गाण्याच्या वेळी असे काही झाले की तो प्रसंग अनेक दिवस होऊनही डोळ्यासमोरुन जात नाही . प्रसिद्ध गायक शंकर महादेवन याने केवळ पियानोच्या नोट्ससोबत गाणे सुरु केले . तू धार है नदिया की , मै तेरा किनारा हूँ , तू मेरा सहारा है , मै तेरा सहारा हूँ , आँखोंमे समंदर है , आशाओं का पानी है जिंदगी और कुछ भी नही , तेरी मेरी कहानी है लताबाईंनी हे ऐकले नि डोळ्यातून अश्रू वाहू लागले . ह्रदयातून निघणाऱ्या सुरांनी शंकर दिदिला पर्यायाने तिच्या दैवी सुरांना उद्देशून म्हणत होता , अंतिमतः तू आणि मीच आहोत , आणि हे जीवन म्हणजे आपलीच कहाणी आहे . तुझी नि माझी . आपलेही तसेच आहे ना ? हे जिवन म्हणजे अं