Posts

Showing posts with the label ब्लॅक इज ब्युटीफुल

थोडा है थोडे की जरुरत है @ 06.02.18

Image
ब्लॅक इज ब्युटीफुल एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी ती चिमुरडी . जेमतेम नववीचे शिक्षण पूर्ण होऊन दहावीत गेलेली . दहावीचे महत्वाचे वर्ष त्यामुळे दिवसभर वेगवेगळ्या शिकवण्या , शाळा यामधे व्यस्त असायची . परंतू अचानक दहावीचे वर्ग सुरु झाल्यावर काही दिवसातच ती फार दुर्मुखलेली रहायला लागली . तिचे काहीतरी बिनसले होते . खरे तर बऱ्यापैकी हुशार या वर्गवारीत मोडली जाणारी ती पोर होती . परंतू त्यासोबतच तिच्यामधे काही अन्य महत्वाच्या गोष्टी होत्या . ती अतिशय अप्रतिम गाणे म्हणायची . परमेश्वराने तिच्या गळ्यात जन्मजातच तान बसविलेली होती . कोणतेही गाणे अतिशय मधूरपणे ती गायची व ऐकणारे मंत्रमुग्ध व्हायचे . यासोबतच तिचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते व तिला लिखाण करण्याची सुंदर हातोटी होती . तिचा इंग्रजीचा पेपर म्हणजे वर्गासाठी एक आदर्श पेपर असायचा . अश्या छान छान गुणांनी युक्त असलेली ती मुलगी दहाव्या वर्गात गेल्यामुळे गाण्यापासून जरा दूर गेली होती . महत्वाचे वर्ष असल्याने कदाचित तिच्या पालक...