Posts

Showing posts from November, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @27.11.18

Image
हॅश टॅग चांगुलपणा तंत्रज्ञानाच्या जगात नवनविन गोष्टींची उत्पत्ती रोजच होत असते . त्याचा वेग देखील इतका जास्त आहे की या बाबी समजून घेण्यासाठी कधीकधी आपल्याला या वेगाची सवय असलेल्या नव्या पिढीची मदत घ्यावी लागते . एक अशीच मदत मला मिळाली एक नवा प्रकार समजून घेण्याकरीता . फेसबुक किंवा व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मिडीयावर एक गोष्ट वापरली जाते ती म्हणजे हॅश टॅग . सुरुवातीला मला हा प्रकार कळत नव्हता परंतू माझ्या मुलीने तो मला समजावून सांगितला . सोशल मिडीयावर वेगवेगळी मते मांडताना जर आपल्याला काही नावे किंवा एखादा महत्वाचा शब्द ठळकपणे मांडायचा असेल तर हॅश या चिन्हासह तो लिहायचा म्हणजे तो शब्द टॅग होतो व त्यामुळे आपल्या लिखाणामधील त्या शब्दाच्या आधारे लोकांना आपले लिखाण शोधायला मदत होते . त्या शब्दाच्या आधारे जास्त लोकांपर्यंत आपल्याला आपले विचार पोहोचविता येतात . साधारणपणे काही बाबी ठळकपणे मांडायच्या असतील तर या हॅश टॅग चा छान उपयोग होऊ शकतो . याचा विचार करताना माझ्या