Posts

Showing posts with the label कॉर्पोरेट

थोडा है थोडे की जरूरत है @ 16.01.18

Image
कॉर्पोरेट आपल्या देशात विविध क्षेत्रांचा विचार करता उद्योग जगतातील खाजगी क्षेत्र ज्याला आपण सामान्यपणे कॉर्पोरेट सेक्टर म्हणून ओळखतो ते एक महत्वाचे क्षेत्र आहे . परंतू सार्वजनिक व सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेकांना या कॉर्पोरेट जगताविषयी एका वेगळ्या प्रकारचे कुतुहल आहे . मुळात त्याबद्दल माहिती नसल्याने किंवा या क्षेत्रात सहजगत्या प्रवेश मिळत नसल्याने या क्षेत्राबद्दल एक प्रकारची गूढता देखील वाटत राहते . प्रचंड पैसा व प्रचंड काम अश्या स्वरुपात वावरणारे हे सारे लोक आपल्या कार्यामधे फार जास्त व्यग्र असल्याने सामाजिक व्यवस्थांमधे त्यांचा वावर कमी असतो . ही सारी मंडळी आपल्या वर्तुळात वावरत असतात ज्या वर्तुळात सामान्य माणसाला प्रवेश करणे जरा दुरापास्त असते . प्रचंड काम असल्याने एक तर या मंडळींकडे वेळ नसतो व त्यासोबतच प्रचंड पैसा मिळत असल्याने त्यांची जीवन जगण्याची शैली फारच वेगळी असते . ब्रॅन्डेड वस्तू वापरणे , ब्रॅन्डेड दुकानांमधे जाणे , पैसा भरपूर असल्याने त्याच्य...