Posts

Showing posts with the label तू कोण?

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.02.23

Image
तू कोण ? तू कोण आहेस ? काय नाते आहे आपले ? सांग ना कोण आहेस तू ? माझे सारे जग व्यापून टाकले आहेस . तसे बघितले तर तू माझ्या सोबत नाहीस , कित्येक दिवस आपली भेट होत नाही , कामांच्या गडबडीत बोलणे देखील होत नाही . परंतू तू माझ्या सोबत आहेस ही जाणीव कायम मनाला धीर देते . खचून जायला होतं कधी कधी . संकटांची मालिका सुरू असते . एका पाठोपाठ एक काहीतरी वाईट घडत राहतं . लढाई सुरु असते . कधी कधी तर असे वाटते की देवालाही माझी परीक्षा घेणे आवडते म्हणून जरा श्वास घेऊ देत नाही . पण या सर्व लढायांमधे मला उभे राहता येते ते केवळ तुझ्यामुळे . जेव्हा अडचणींची व अडथळ्यांची शर्यत पार करून करून दम भरून येतो व निवांत जगण्यासाठी लागणारे श्वास कमी पडायला लागतात तेव्हा … मी तुझ्यासोबत आहे .. कायम … हे तुझे वाक्य त्या राहीलेल्या श्वासांची भरपाई करते आणि मोकळे वाटायला लागते . या तुझ्या आधाराच्या ताकदीचे मला फार आश्चर्य वाटते . कसे काय जमते हे तुला ? खरे तर माझ्या अडचणींचा पाढा एवढा मोठ...