Posts

Showing posts with the label Article under the column थोडा है थोडे की जरूरत है

Article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मुखवट्यांची प्रामाणिकता कला शाखेच्या अंत्य वर्गातील विद्यार्थिनींना मी मागच्या आठवड्यात एक कविता शिकवित होतो. त्या इंग्रजी कवितेमधे माणसाला जगताना धारण करावी लागणारी वेगवेगळी रुपे वर्णन केलेली आहेत. कवी त्यात असे म्हणतो की ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगानुरुप आपण वस्त्र परीधान करतो त्याच प्रमाणे आपण वेगवेगळे मुखवटे देखील धारण केलेले असतात. या सर्व मुखवट्यांच्या गर्दीमधे आपला मूळ मुखवटा कसा आहे हे कळतच नाही. त्या मूळ मुखवट्याचा शोध हाच खरेतर आत्मज्ञानाच्या दिशेचा प्रवास आहे. अश्या पद्धतीचे ते सारे वर्णन होते. कवितेचा अर्थ कवीला साधारणपणे जसा अपेक्षित होता तसा मी सांगितला परंतू माझ्या गुरुंनी मला दिलेल्या अध्यापनाच्या मूलतत्वानुसार मी माझ्या विचारी विद्यार्थीनींना या कवितेच्या मर्माबद्दल बोलण्यास सांगितले. त्या बोलायला लागल्या. सर्वांचे छान छान विचार मी ऐकीत होतो तेव्हड्यात माझ्या एका विद्यार्थी मैत्रीणीने मलाही विचार करायला लावणारे मत मांडले. ती मला म्हणाली की सर, या कवितेतील मांडणी तथ्यांवरच आधारीत आहे. आपल्याला वेगवेगळे मुखवटे लावूनच वावरावे लागते कारण आपण सामाजिक व्यवस्थांमधे वावरतो...