Posts

Showing posts with the label हॅसल फ्री टॅग

थोडा है थोडे की जरुरत है @ 17.12.19

Image
हॅसल फ्री टॅग कार्यालयीन कामानिमीत्त किंवा भावाकडे नागपूरला माझे नेहेमीच जाणे होते . परंतू परवा नागपूरला जाताना मी जरा जास्त उत्साहात होतो . अमरावतीहून नागपूर हे आता सुंदर रस्त्यामुळे घर आंगण झालंय . सहजच नागपूरला जाऊन येणे होते . त्यामुळे माझे नागपूरला जाणे काही फार कौतुकाचा विषय नव्हता . परंतू तरी देखील मी उत्साहात होतो . यावेळी माझ्या मित्र मंडळींनाही नागपूर प्रवासाबद्दल सांगून झाले होते . बरे ! मी प्रवास नेहेमी धमाल करीत करतो हे सर्वांनाच ठाऊक असल्याने , गाणे , खाणे , मधे कुठेतरी थांबून छान फोटो वगैरे सारे नेहेमीप्रमाणे होणार होते त्यामुळे त्याचेही नवल नव्हते . तरीदेखील यावेळच्या माझ्या नागपूर ट्रीपची एक खास विशेषता होती ज्यामुळे मी उत्साहीत होतो . ती विशेषता म्हणजे माझा यावेळचा प्रवास हॅसल फ्री होणार होता . म्हणजे कोणत्याही अडचणी शिवाय होणार होता . खरे तर या अमरावती नागपूर प्रवासात अडचण तशी काहीच येत नाही . सुंदर रस्ता , दुतर्फा छान छान फुलझाडे , चौपदरी रस्ता असल्य...