Posts

Showing posts from November, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
ह्युमनोटोपीया रविवारच्या दिवशी मी जरा दुपारी आराम करायचा ठरविला असतानाच आमचा चिरंजीव देवांग त्याच्यासोबत मी एक सिनेमा बघावा असा हट्ट करायला लागला. मी सुरुवातीला जरा उत्सुक नव्हतो. पण त्याच्या एका वाक्याने मला तो चित्रपट बघण्याची इच्छा झाली. मला त्याच्यासोबत चित्रपट बघण्याचा हट्ट करताना तो म्हणाला, बाबा! हा सिनेमा तुम्हालाही बघण्यासारखा आहे! या वाक्यावर मी चमकलो. मला बघण्यासारखा म्हणजे मोठ्यांना बघण्याचे चित्रपट कसे असतात हे तो समजतो आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय आहे ते बघायलाच हवे म्हणून मी चित्रपट बघायला बसलो. डीस्ने कंपनीचा चित्रपट होता व नाव देखील जरा वेगळे होते.. झुटोपीया. काय असेल या चित्रपटात याचा विचार करीत मी चित्रपट बघणे सुरु केले. देवांगने तो आधी एकदा बघितलेला असल्याने कोणत्या ठिकाणी काय विशेष आहे याबद्दलचे त्याचे समालोचन सुरु होते. सुरुवातीला जरा निरुत्साहानेच बसलेलो मी नकळत त्या चित्रपटात गुंतलो व चित्रपट संपला तेव्हा एक नितातं सुंदर चित्रपट बघितल्याचा आनंद प्राप्त झाला. चित्रपटाच्या नावाला सार्थ ठरविणारा एक अत्यंत कल्पक विचार यात मांडला होता. झुटोपीया म्हणजे झू (प

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
आई वडीलांचे छत्र माझा मित्र विनय व त्याची पत्नी खिन्नपणे बसले होते. फार वाईट वाटले होते त्यांना. मनाला वेदना झाल्यावर त्या कुणाजवळ बोलल्या की दुःख कमी होते म्हणून त्यांनी मला घडलेली घटना विषद केली. अर्थात ते सर्व सांगितल्यावर मी त्यावर काही उपाययोजना करावी, मुलांचे समुपदेशन करावे अशी देखील त्यांची अपेक्षा होती. घडलेला प्रकार मनाला व्यथित करणारा होताच परंतू त्याहीपेक्षा मला तो विचार करायला लावणारा प्रसंग वाटला. काही घटना या घडतात व आपण त्याबाबत बरेचवेळा दुःख किंवा आनंद व्यक्त करुन पुढे मार्गक्रमण करतो. परंतू प्रत्येकवेळी असे करु नये. काही घटनांचे विशेष संदर्भ असतात व त्याबाबत जरासा विचार केला तर आणि विशेषतः प्रसंग वेदनादायी असेल तर त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न देखील करता येऊ शकतात. त्यासाठी वागण्यातले काही बदल, वातावरणात काही सुधारणा केल्यास आपल्याला अपेक्षित असे घडण्याची शक्यता असते. म्हणूनच विनय व वहिनींनी सांगितलेला प्रसंग मला विचार करायला लावणारा वाटला. गोष्ट तशी साधी व नेहमीचीच होती. त्यातल्या त्यात वहिनींना जरा जास्त वाईट वाटले होते. त्या प्रसंगामुळे संस्कारांवरच प्रश्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळी वायरलेस रेडीयोवरचा मेसेज सर्वजण ऐकत होते. रात्र झाली असली तरी देखील डोळ्यांना झोप नव्हती. मेसेज ऐकून त्यांना तर काय वाटत असावे याचा अंदाज अनेकांना येऊच शकत नाही. पण त्या समुहात मात्र धक्का किंवा दुःख याच्या पलीकडे निर्माण झालेला निर्विकारपणाच ठळकपणे प्रत्येक चेहेऱ्यावर दिसत होता. बोलण्याची इच्छा कुणाचीही होत नव्हती.. पण वायरलेस रेडीयो वरची बातमी त्यांच्यापैकी कुणालाही हादरवून वगैरे टाकत नव्हती.. रोजच तश्या बातम्या ऐकाव्या लागायच्या त्यामुळे मनात थोडेसे खट्...बस्स यापलीकडे काहीच नाही. बातमी होती- कल पुंछ सेक्टरमे पाकीस्तानी रेंजर्स द्वारा किये गये शेलींगमे सेना के दो जवान शहीद हो गये.. पाकिस्तान की तरफसे किये जाने वाले इन हरकतों का सेना की तरफ से मुँ तोड जवाब दिया जायेगा ऐसा ऐलान सरकार की तरफ से... मेजरने रेडीयो बंद केला.. करड्या आवाजात तो म्हणाला, बॉईज कल पुंछ मे अटॅक हुवा इसका मतलब आज शायद अपने रजौरीमे मुव्हमेंट हो सकती है, अल्टरनेट प्लान लग रहा है.. बी अलर्ट! डोन्ट टेक रीस्क अॅन्ड स्टे कनेक्टेड.. नो एक्स्ट्रा अॅडव्हेंचर.. गॉट इट? असा आदेश देऊन तो बंकरच्या दुसऱ्या बाजुला जाऊन

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

Image
बी.टी. सरांची आनंद व्याख्या एखादा वक्ता श्रेष्ठ का असतो? या प्रश्नाची अनेक उत्तरे राहू शकतात. त्याच्या बोलण्याच्या शैलीमुळे, प्रभावी सादरीकरणामुळे, विषयाच्या मांडणीमुळे, अभ्यासपूर्ण विवेचनामुळे किंवा कधी कधी आक्रमकतेमुळे देखील वक्ते व्यासपीठ गाजवीत असतात. परंतू वक्ता खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो तो वेगवेगळ्या विषयावरील त्याच्या मुलभूत चिंतन प्रक्रीयेमुळे. नवा किंवा वेगळा विचार करण्याची क्षमता असलेला वक्ता आपल्या प्रदीर्घ चिंतनातून आपल्याला जे सांगतो ते केवळ बुद्धीसाठी नसते तर ते आपल्या ह्रदयापर्यंत पोहचून जीवनदर्शक तत्व देखील बनू शकते. सकारात्मक चिंतनाचे पाठबळ असले की श्रेष्ठ दर्जाचा वक्ता वेळेवर देखील फार सुरेख विवेचन करुन संबंधित विषयांचे नवनविन पैलू श्रोत्यांसमोर उलगडून दाखवित जातो व त्या शब्दामृताच्या सरींमधे आपण चींब भिजून तृप्त होतो. अश्याच प्रकारचे विवेचन नुकतेच ऐकण्याचा योग आला.. ते देखील वक्तादशसहस्त्रेषु प्रा. बी. टी. देशमुख सरांकडून.. निमित्त होते अमरावती येथील दै. हिंदुस्थान या वृत्तपत्र समुहाद्वारे काढण्यात आलेल्या दिवाळी अंकाच्या विमोचनाचे...दरवर्षी हा दिवाळी अंक विमोचन

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सखी त्या दिवशी वनात रात्री अधिकच गडद काळोख होता. दूरवर हिंस्त्र श्वापदांच्या ओरडण्याचाही आवाज येत होता. वनवासाच्या जीवनाची आता त्या सर्वांना सवय झाली होती. पाच शुर पतींची पत्नी असली तरी देखील तिचे मन रात्रीच्या वेळी त्या घनघोर अरण्यात बावरल्यागत व्हायचे. परंतू आज मात्र पांचाली शांतपणे झोपडीच्या बाहेर टीपूर चांदणे न्याहाळत होती. त्या भयावह अंधारातही आज ती संपूर्णपणे भयमुक्तपणे एका खांबाला टेकून बसली होती. आज तिच्या मनाला भयाचा किंवा नेहेमीच्या अनामिक हुरहुरीचा स्पर्शही नव्हता कारण तिच्या समोर दुसऱ्या खांबाला टेकून तिचा सखा, वासुदेव कृष्ण बसला होता. आज मुद्दाम पांडवांना भेटायला तो आला होता. आता मात्र त्याला ठाऊक होते की त्याच्या सखीला त्याच्याशी बोलायचे होते. धर्मराज, पार्थ व भीम झोपडीत पहुडले होते आणि नकुल व सहदेव दूरवर गस्त देत होते. सख्यासोबत काही वेळ त्या नीरव शांततेत बसल्यावर पांचालीने त्याला एक प्रश्न विचारला...वासुदेवा, माझ्या सख्या, काय हे भोग आमच्या नशीबात आलेत.. किती संकटे, किती अवहेलना, केवढी विटंबना, केवढा अपमान... हे सारे काही कल्पनातीत आहे..परंतू मी हे सारे सहन करु शकले क