Posts

Showing posts from February, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 27.02.18

Image
शिक्षण बदलुयात … संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या या वर्षीच्या दिक्षांत समारोहात विद्यापीठाचे माननीय कुलगुरु आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माननीय अध्यक्ष यांनी आपापल्या भाषणांमधे शिक्षणासंबंधीचे दोन महत्वाचे मुद्दे मांडले . बदलत्या काळात या दोन्ही मुद्द्यांवर शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येक नागरीकाला विचार करुन काही बाबी कार्यान्वित कराव्या लागणार आहेत . सध्या शिक्षणाच्या परंपरागत पद्धतींच्या उपयोगीतेबाबत फार चर्चा होताना आढळते . शिक्षणासारख्या समाज घडविणाऱ्या व्यवस्थेबाबात अशी चर्चा होणे हेच मुळात दुर्दैव आहे . परंतू तशी चर्चा होत असेल तर त्यामधून काही बदल करता येतील का या संदर्भात विचार होणे गरजेचे आहे . शिक्षण देणाऱ्या व्यवस्थाच बदलवून टाकुया असा टोकाचा विचार देखील करुन चालणार नाही कारण व्यवस्था उभारायला काही पिढ्यांचे योगदान मिळालेले असते व त्या सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिलेलेच असते . परंतू या व्यव