Posts

Showing posts from October, 2013

थोडा है, थोडे की जरुरत है या सदराचा दै. हिन्दुस्थान मधील आजचा भाग

स्कुलव्हॅन मधील कल्पक विश्व मानवाला परमेश्वराने विकासात्मक विचार करण्याची शक्ती प्रदान करुन इतर प्राणीमात्रांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारचे आणि क्रियाशील वरदान दिले. या वरदानाचा पुरेपुर वापर करुन अनेकजण समाजाला वैचारिक दृष्टीने सुदृढ बनविण्याचे कार्य करीत असतात. अश्या प्रकारचे कार्य केवळ अभ्यासु तत्वज्ञ, विचारवंत याच वर्गवारीतील लोक करतात असा गैरसमज साधारणपणे समाजात आढळतो. परंतु एखादे अतिशय साधे काम थोड्याश्या कल्पकतेने व कार्य करण्याच्या तळमळीने केल्यास वैचारिक सुदृढीकरण ठरु शकते. अशाच एका वैचारिक सुदृढीकरणाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रीयेची ही छोटीशी गोष्ट: इंग्रजी पदव्युत्तर झालेला माझा एक विद्यार्थी काही कारणामुळे 'बी प्लस' मिळवू शकला नाही. बी.एड. झाले होते पण शिक्षकाची नोकरी प्राप्त करण्यासाठी केवळ 'सरस्वती'च्या आशिर्वादाने भागत नसल्याने आणि 'लक्ष्मी' त्याच्यावर फार प्रसन्न नसल्याने त्याने नोकरी न करण्याचे ठरविले आणि एक धाडसी निर्णय घेतला. तो पदवीला असताना एका डाॅक्टरकडे ड्रायव्हरचे काम करायचा. सायंकाळी त्याला काम असायचे त्यामुळे दुपारी त्याला काॅलेज करता याय