Posts

Showing posts from February, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @26.02.19

Image
खुदी को कर बुलंद .. कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी आयोजक आले . मी कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी होतो व माझ्या हस्ते काही मंडळींचा सत्कार केला जाणार होता . ज्या लोकांचा सत्कार होणार होता त्यांची नावे देखील पत्रिकेत होती . वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या लोकांची नावे होती . मला त्या सर्वांबद्दल बोलणे अपेक्षित होते त्यामुळे मी त्यांच्या बद्दलची माहिती जरा बारकाईने वाचत होतो . त्या यादीमधील एका नावापाशी मी का कोण जाणे जरा थांबलो . ते नाव मला माझ्या कुठेतरी ओळखीच्या व्यक्तीचे वाटत होते . मी माझ्या भाषणाच्या टीपणांमधे ती सारे नावे लिहून घेतली . कार्यक्रमाची माझ्या दृष्टीने तयारी झाली होती परंतू ते नाव मात्र काही केल्या मनःपटलावरुन निघत नव्हते . त्यानंतर पुढचे दोन तीन दिवस मी माझ्या नियमीत कामांमधे व्यस्त असल्याने मला जरा त्या नावाचा आणि कार्यक्रमाचाही विसर पडला . कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी त्या आयोजकांचा वेळेबाबत फोन आला तेव्हा मी परत एकदा माझे भाषणाचे टिपण