थोडा है थोडे की जरूरत है@12.12.17
आनंद मिश्रण परवा साक्षी मला म्हणाली, अविदादा माझे लग्न होतेय परंतू बाबा खुश नाहीत, नाराज आहेत. कारण छोटेसे आहे परंतू त्यांच्या नाराज असल्याने मला फार वाईट वाटते आहे. माझ्या लग्नासाठी सारे पाहुणे येणार आहेत, बऱ्याच वर्षांनंतर जवळपास सर्वांनाच येणे जमतेय, यावेळी खूप नातेवाईकांनी सुट्या काढून मुद्दाम येण्याचे ठरविले आहे. याचे कारण खूप वर्षांनंतर आमच्या परीवारात लग्न होतेय. त्यामुळे प्रत्येकजण आनंदात आहे. मुख्य म्हणजे आता आमच्या घरची नवी पिढी आता छान आनंद घेण्याच्या वयात आली आहे. अश्यावेळी सारे सारे आनंदात असताना माझे बाबा मात्र एका छोट्याश्या कारणामुळे नाराज होऊन बसलेत. बरे वाटत नाही मला.. तू बाबांशी जरा बोलतोस का? मी तिला हो म्हणालो. साक्षीचे बाबा ज्या कारणामुळे नाराज झाले होते ते कारण ऐकल्यावर मी त्यांच्याशी बोलायलाच हवे असे मला वाटले. साक्षीच्या बाबांचे चुकत होते असेही नव्हते. ज्या मुशीत आपली जडणघडण झाली ती सहजासहजी बदलविणे कठीणच असते. तिच्या बाबांबद्दल साक्षीची प्रतिक्रीया जराशी तीव्र होती कारण ती एकदमच नव्या पिढीची होती. मला मात्र साक्षीची आणि तिच्या बाबांचीही भुमिका योग्य रितीने सम...