Posts

Showing posts with the label अकाऊंट बंद करुया!!

थोडा है थोडे की जरुरत है @02.01.24

Image
अकाऊंट बंद करुयात … नवे वर्ष आले . नव्या वर्षासोबत अनेक नवे रीझोल्युशन्स ठरले . काहींनी ते मनात ठेवले , काहींनी ते सोशल मिडीयावर सर्वांना सांगितले . प्रकार कोणताही असो , नव्या वर्षापासून आता काहीतरी करायचे असे प्रत्येकानेच ठरविलेले असते . म्हणूनच नवे वर्ष म्हणजे केवळ एक तारीख बदलून दुसरी तारीख येणे एवढाच भाग नाही तर मानसिकदृष्ट्या तो एक चार्जींग पॉईंट असतो . वर वर बघता अनेक मंडळी या नव्या वर्षात काहीना काही नवे सुरु करून त्याचे स्वागत करतात . परंतू अनेक अश्या गोष्टी असतात ज्या मात्र वर्षानूवर्षे सांभाळल्या जातात . मनाच्या खास अकाऊंटमधे त्या ठेवल्या जातात . त्यांच्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून त्यावर व्याज देखील वाढविले जाते . हे व्याज म्हणजे वेगवेगळ्या लोकांप्रती आपल्या मनात जमा होत असलेला ग्रह असतो जो चक्रव्याढ व्याजाने वाढत जातो . मनात साठविलेल्या या अकाऊंट सोबत आणखी काही अकाऊंट लिंक केलेले असतात . त्यांचाही सांभाळ काही मंडळी मनापासून करतात . या लिंक अकाऊंटचे उ...