Posts

Showing posts with the label पंधरा मिनीटांची गोष्ट

थोडा है थोडे की जरुरत है @ 07.01.2020

Image
पंधरा मिनीटांची गोष्ट अजय एका मोठ्या कंपनीच्या एका मोठ्या विभागाचा बाॅस होता . त्या दिवशी कंपनीत प्रचंड काम सुरु होते . काहीतरी महत्वाची माहिती मुख्य कार्यालयाला पाठवायची होती . त्यामुळे अजयचे कार्यालय कामाची वेळ आटोपली तरी सुरुच होते . अजय स्वतः सर्व कामांवर लक्ष ठेवून होता . कार्यालयाचा प्रमुख म्हणून त्याच्यावर सर्वात जास्त जबाबदारी होती . त्यामुळे सहाजिकच ताण देखील जास्त होता . मोठ्या मेहनतीने अजय त्या कंपनीच्या इतक्या मोठ्या पदावर पोहोचला होता . सुरुवातीपासूनच तो जिद्दी होता . तसे त्याचे शिक्षण फार सरळ सरळ झाले नव्हते . वेगवेगळ्या शाखा बदलवित त्याने शिक्षण पूर्ण केले होते . सुरुवातीला छोट्या छोट्या कंपन्यांमधे पडेल ती कामे केली . अनुभव मिळविला आणि मग पुढे पुढे सरकत राहीला . त्याचा जनसंपर्क देखील दांडगा होता . त्यामुळे त्याला पुढे सरकण्यास मदत झाली . अर्थात जीव ओतून काम करणे हा मात्र त्याचा स्थायी भाव असल्याने त्याला यश मिळत राहीले . मध्यंतरी काही कठीण प्रसंग देखील ...