Posts

Showing posts with the label हसरे दुःख

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.10.19

Image
हसरे दुःख ( आजचा लेख म्हणजे , माझ्या थोडा है च्या वाचकांकरीता , माझी मुलगी अनन्या हिने नुकत्याच लिहिलेल्या तिच्या मन कस्तुरी रे या इंग्रजी भाषेतील ब्लाॅगमधील एका भागाचा स्वैर भावानुवाद होय .) केवळ पाचच मिनीटे उरली होती . माझ्या एन्ट्रीची वेळ झाली होती . मी तोंडाला मेकअप लावून तयार होतो . बाहेर हजारो लोक माझी वाट बघत होते . जीवनातील विविध विवंचनांनी त्रासलेले , अडचणींचा सामना करुन थकलेले , आणि या सर्व रोजच्या कामातून काही वेळ काढून आपल्या परीवारासोबत मनमुराद हसण्यासाठी आलेले हे लोक , माझीच वाट बघत होते . मला त्यांच्याकरीता आज पुन्हा एकदा मनापासून सर्व वाकड्यातिकड्या गोष्टी करायच्या होत्या . वेगवेगळे अंगविक्षेप करुन , तोंडाचे वेगवेगळे प्रकार करुन , उगाचच धडपडून , वाटेल तसे नाचून मला माझ्या अंगावरच्या पोषाखासह आणि विशेषतः चेहेऱ्यावर लावलेल्या मेकअपच्या आणि माझ्या नाकावरच्या त्या बाॅलच्या आधारे मला त्यांना हसवायचे होते . मी देखील तयार झालो होतो . मेकअपच शेवटचा थर लावतच होतो...