Posts

Showing posts from June, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 02.07.19

Image
डीमेन्शीया .. नेमका कोणता ? साधारण पाच वर्षांच्या कालावधी नंतर मी काकांना भेटत होतो . माझ्या बालपणापासून त्यांचा सहवास मला लाभला . घराच्या शेजारीच ते रहायचे आणि त्यामुळे त्यांच्या अंगा खांद्यावरच मी खेळलो असे म्हणायला हरकत नाही . काकांचा एक मुलगा माझ्या बरोबरीचा व दोन मोठ्या मुली होत्या त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या . आम्हा सर्वांची छान मैत्री होती . काका आम्हा सर्वांना सोबत फिरायला वगैरे न्यायचे आणि त्यामुळे त्यांच्या घराशीच छान नाते होते . पुढे मात्र मी दुसऱ्या गावी शिकायला आल्यामुळे संबंध कमी झाले . नंतर नंतर तर भेट होईनाशी झाली . परंतू त्यांच्या परीवाराबद्दल मधून मधून कळत होते . त्यांचा मुलगा जर्मनीला स्थायीक झाला होता . एक मुलगी पुण्याला व एक नागपूरला होती . मधेच काही वर्षांपूर्वी काकूंचे देहावसान झाल्याची पण बातमी कळली होती . परंतू त्यावेळी त्यांना भेटलो होतो . परंतू मागच्या महिन्यात काकांच्या भेटीचा पुन्हा योग आला . पुण्याला त्यांच्या मुलीकडे काका राहतात