थोडा है थोडे की जरुरत है @17.09.19
मैत्रीतील मदतीचे भांडण गोष्ट तशी छोटी होती पण त्या दोघांचे भांडण मात्र झालेच ते देखील मदत करणे आणि ती नाकारणे यावरुन ! मला तुझे हे अजिबात आवडत नाही . मी तुला मदत करायला बघतोय आणि तू ती मदत स्विकारतच नाही . माझ्याकडून मदत घ्यायला काय हरकत आहे . अश्या प्रकारे वागून तू मला दूर लोटते आहेस . मला तुला कोणत्याही स्वरुपाची मदत करण्यात किती आनंद होतो हे तुला कळणार नाही . आणि मदत देखील काय करतोय ? काहीच तर नाही . छोटेसे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करतोय . या माझ्या मदतीमागची भावना तू समजून घेत नाहीस याचे मला फार वाईट वाटते . एरवी तर असतेसच तू आपल्या नेहेमीच्या वर्तुळात तेथे मी कुठे लुडबुड करतो का ? किंवा करण्याची इच्छा असली तरी ती करता येते का ? नाही . मग या प्रकारे तरी मला तुला मदत करु देत जा . पण तुझा स्वभाव आड येतो . कुणाकडूनही मदत घ्यायची नाही . पण इतर कुणी आणि मी यात फरक आहे की नाही ? मला देखील सर्वच लोकांप्रमाणे तू समजत असशील तर मग कठीण आहे ...