थोडा है थोडे की जरुरत है @ 10.01.23
रॉंग नंबर दवाखान्यात त्या दिवशी डॉक्टरांच्या चेंबरमधून बाहेर पडताना ते आजोबा चिडतच बाहेर पडले . मागे आजी होती . जरा आजीला ऐकू जाईल एवढ्या आवाजात त्यांची चिडचिड सुरु होती . तुला किती वेळा सांगितलंय की डॉक्टरकडे येताना सगळी कागदे सोबत आणत जा . वेगवेगळी प्रिस्क्रीप्शन्स आहेत मग ती एका जागी का नाही ठेवत ? आता ते दोन महिन्यापूर्वीचे रीपोर्ट मागत होते आणि तू दोन वर्षांपूर्वीचे दाखवत होतीस . आता पुन्हा उद्या यावे लागेल मला . एकाच भेटीत काम व्हायला हवे ना ? सोपे आहे का आपल्याला या वयात आता दवाखान्यात येणे ? तुला समजत कसे नाही ? दिवसेंदिवस ना तू वेंधळी होत चालली आहे . या शेवटच्या वाक्याच्या आधीपर्यंत आजी शांत होती कारण तिची चूक झाली होती . परंतू शेवटच्या वाक्याने बहुदा आजोबांनी आजीच्या सहनशक्तीची मर्यादा पार केली होती . ते वाक्य ऐकल्याबरोबर आजोबांची चिड चिड ऐकत व त्यांचाच हात धरून पायऱ्या उतरणाऱ्या आजीने एकदम हात झटकला . रागाने आता आजीचे बोलणे सुरु झाले . मला काय वेंध...