Posts

Showing posts with the label आसावरी

थोडा है थोडे की जरुरत है @14.01.2020

Image
आसावरी का गं ? माझ्या जेवणाची काही चिंता आहे की नाही तुला ? मला उपाशी ठेवून कुठे गेली होतीस भटकायला ? इतका मी जड झालेलो आहे का तुला ? तसे वाटत असेल तर मला सांगून दे , मी मरुन जातो . नाहीतरी सध्या तुझे या घराकडे लक्षच नाही . तू घराबाहेर आनंद शोधण्याचा काय प्रयत्न करते आहेस ? हे घर म्हणजेच तुझे कार्यक्षेत्र आहे . येथे आधी लक्ष दे आणि मग बाहेरचे बघ . घराकडे लक्ष देणे , घरातल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेळांनुसार त्यांना खायला देणे , या घराला सांभाळणे , या घराच्या भिंतींमधे स्वर्ग शोधणे हेच तुझे कर्तव्य आहे . त्या कर्तव्याला सोडून तू कशी काय बाहेर राहू शकतेस ? तुझा आनंद या घरातील प्रत्येकाशी निगडीत आहे आणि तेच तुझे आद्य कर्तव्य आहे . या घरांतील कर्तव्यांकडे जर तू दुर्लक्ष केलेस तर तो अपराध ठरु शकतो हे ध्यानात ठेव नव्हे तो अपराधच आहे . या घरातील कर्तव्ये हेच तुझे मनोरंजन आणि हाच तुझा आनंद हे लक्षात ठेव . आज मला उपाशी ठेवून तू बाहेर गेलीस , गेलीस तर गेलीस परंत...