Posts

Showing posts from January, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 02.02.21

Image
शब्दांची किमया एक सुंदर सायंकाळ . मनाला उगाचच हुरहुर लावणारी कातरवेळ . अश्या शांत समयी आपण आपल्या निवांतपणे बसून काही सुखद क्षण अनुभवत असतो . अश्यावेळी दिवसभराचा कामाचा शीण आपण विसरण्याचा प्रयत्न करीत असतो . घरासमोरच्या बागेत , बाल्कनीमधे किंवा पाळण्यावर आपण बसलेले असतो . अश्यावेळी आपल्याला आवडते तशी मस्त स्ट्रॉंग कॉफी तयार होते व तो वाफाळलेला कप आपण हातात धरतो . वातावरणात जरासा गारठा असल्याने त्या गरमागरम कॉफीच्या कपाभोवती आपला तळहात गुंडाळून आपण त्याची उब अनुभवतो जी थेट मनापर्यंत पोहोचते . आपल्याला मनापासून छान वाटू लागते . अश्यावेळीच आपल्या आवडीच्या प्लेलिस्ट मधून एक मस्त गझल लागते . जगजीत सिंगची गझल तुम इतना जो मुस्कुरा रहे हो , क्या गम है जिसके छुपा रहे हो सुरु होते . त्या गझलच्या सुरेल तरंगांसोबत आपले मन एक वेगळी तरलता अनुभवायला लागते . त्या गझल सोबत आपण गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतो . दिवसभराच्या धावपळीनंतर आपण मिळविलेले हे सुंदर क्षण किती मौलिक असतात . जगजीत स