Posts

Showing posts from May, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 01.06.21

Image
संध्याकाळ सध्या या सोशल मिडीयाच्या देवाणघेवाणीमधे काही नको असलेल्या , तर काही फारच आवश्यक अश्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात . प्रत्येकाचे सध्या व्हॉट्स ॲप , फेसबुक आणि इतर माध्यमांवर वेगवेगळे ग्रुप असतात . त्यामुळे कधी कधी या देवाण घेवाणीचा एवढा मारा होतो की सर्व संदेशांना न्याय देणे म्हणजे किमानपक्षी अंगठा तरी दाखविणे हे देखील शक्य होत नाही . खूप साऱ्या संदेशांमुळे मोबाईलची मेमरी संपते . मग स्वच्छ मोबाईल अभियान करावे लागते आणि मग सर्वच काही जे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे ते विसर्जीत करुन पुन्हा आपला मोबाईल ताजातवाना करुन घ्यावा लागतो . परंतू अश्यात कधी कधी एखादा खूप चांगला विचार आपल्याकडून सुटून जातो . अशीच एक फार सुंदर कविता माझ्याकडून सुटून गेली . मला ती माझ्यावर फार प्रेम करणारे दादा , ज्येष्ठ विधिज्ञ विजयराव केवले यांनी पाठविली होती . त्यांनीच फोन करुन ती वाचायला नि ऐकायला सांगितली . एक अत्यंत साधी रचना परंतू त्यामधील भाव थेट मनाला भिडला . खरे तर फार मो