थोडा है थोडे की जरुरत है @ 15.12.20
अर्बन अँक्स - १ काय होतंय तुला ? सगळेच तर आहे आपल्याकडे . घर आहे , गाडी आहे , आवश्यक ती चैन करता येते , कधीच आर्थिक चणचण नसते , पोरगा व्यवस्थित आहे , तुझेही काम नीट सुरु आहे , घरात कशाचीच कमतरता नाही , दोन वेळेला व्यवस्थित खायला मिळण्याऐवढे किंबहुना जास्तीच आपल्याकडे आहे . हे सारे असताना तुला कशाचे टेन्शन आहे हेच मला कळत नाही . कशाची भिती वाटते , कशाची अस्वस्थता आहे , कशामुळे झोप लागत नाही हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे . एका सुखी आयुष्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व आपल्या घरी भरभरुन आहेत तरी देखील तुला समस्या आहेच . बरं नेमके काय वाटते हे देखील तू सांगू शकत नाहीस . जरा बाहेरचे जग बघ . सध्याच्या या कोरोना काळात तर कित्येक लोकांचे अक्षरशः हाल झालेत . लोकांचे आर्थिक स्थैर्य हरवून बसलेय . आपल्याला तशी काहीही समस्या नसताना तुला नेमके काय होते हे मला कळतच नाही . सारखी अस्वस्थता आणि भिती . कशासाठी ? मला आता कंटाळा आलाय तुझ्या असल्या वागण्याचा . या सर्व गोष्टींमुळे त...