थोडा है थोडे की जरुरत है @ 05.01.21
एकच दाणा तुम्ही एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलात . अशी कोणती एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जी तुम्हाला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कायम स्मरणात आहे ? एका मुलाखती दरम्यान एका सिनेपत्रकार भगिनीने हा प्रश्न सध्या फार चर्चेत असलेल्या एका अभिनेत्याला हा प्रश्न विचारला . चित्रपट आणि वेबसिरीज यामधून अत्यंत कृरकर्मा असे व्यक्तीचरीत्र रंगविणारा तो अभिनेता आपल्या गत आयुष्याबद्दल सांगत होता . मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे मधून मधून सांगितल्यामुळे त्या पत्रकार भगिनीने त्याला हा प्रश्न विचारला होता . खरे तर मुख्यत्वे करुन अत्यंत थंड डोक्याचा खलनायक म्हणून वेगवेगळ्या भूमिका रंगविणारा हा अभिनेता या प्रश्नावर जरा विचारात पडला . परंतू त्यानंतर त्याने संवेदनशीलपणे जे उत्तर दिले त्यावरुन त्याच्या क्रूर भुमिकांच्या मागे एक अत्यंत संवेदनशील माणूस दडलेला आहे हे लक्षात आले . तो म्हणाला , तश्या तर अनेक गोष्टी आहेत परंतू एक गोष्ट मात्र अगदी ठसठशीतपणे माझ्या मनावर कोरल्या गेली आहे . तो प...