Posts

Showing posts from August, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.08.21

आठवण आठवण येतेच गं , पण अडकून गेलोय जरा कामात . यावर्षी ठरवले होते पक्के की काहीही झाले तरी तुझ्याकडे यायचे . मी तर आधीपासून सांगून ठेवले होते माझ्या बॉसला की या वेळी ऑगस्ट महिन्यात मला तीन दिवस सलग सुट्या हव्यात . किती वर्षे झाली ना ? पण या वर्षीचे मात्र पक्के ठरले होते . पण काय करु व्हायची ती गडबड झालीच . नेमकी कंपनीमधे आमच्या मूळ कंपनीच्या लोकांची व्हीजीट ठरली . मल्टीनॅशनल कंपनी आहे ना आमची . सगळी मॅनेजमेंट तिकडची परदेशातली . त्यांना काय महत्व आपल्या सणांचे . त्यांची व्हीजीट ठरली आणि मी इथला सेक्शन हेड असल्याने बॉसने मला सांगितले की या व्हीजीटचे फार महत्व आहे . यामुळे एक नवीन डीव्हीजन सुरु होणार आहे कंपनीमधे आणि म्हणून या व्हीजीटच्या वेळी माझे हजर राहणे गरजेचेच आहे . निर्णय मात्र त्याने माझ्यावर सोडला . मला पण सुचेना की काय करायचे . मग शेवटी विचार केला की यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी मला तुझ्याकडे येता येईल परंतू ही व्हीजीट पुन्हा होणार नाही . मी नसतान