Posts

Showing posts from December, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 28.12.21

Image
खिन्नता ते उभारी .. या वर्षाचा शेवटचा रविवार म्हणून मुद्दाम भटकंती करायचे ठरविले आणि काहीही न ठरवता बाहेर पडलो . गाडीत बसल्यावर ठरले की ज्या ठिकाणी उजवीकडे किंवा डावीकडे जायचा रस्ता येईल तेव्हा प्रत्येकाचे मत घ्यायचे व त्या दिशेने वळायचे . अशीच आपली एक गंमत . असे करता करता शहराच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरून अक्षरशः भटकणे सुरु होते . मज्जा असते ना यात ? एखाद्या वेळी काहीही न ठरवता भटकण्यात . काही वेळानंतर मात्र चहा पिण्याची इच्छा झाली व आजकाल एक नव्याने निर्माण झालेली व संपुर्णपणे बदललेली चहाची टपरी शोधली . आता ही टपरी एका नाविण्यपूर्ण दुकानामधे परावर्तित झाली आहे . त्या दुकानाला छान छान नावे मिळाली आहेत . आता कळकट मळकट भांड्यामधे उकळला जाणारा चहा , पितळेच्या स्वच्छ भांड्यांमधे उकळला जातो . दुकानामधे वेगवेगळ्या लेखकांची वाक्ये किंवा कविता लिहीलेल्या असतात . दुकानाचे नाव प्रिंट केलेले छान छान कप असतात आणि पाण्यात बुचकळून ठेवलेल्या कपांमधे न देता , या सुंदर कपांमधे स्प