Posts

Showing posts with the label आनंदाचा ऑक्सीजन

थोडा है थोडे की जरुरत है @22.01.19

Image
आनंदाचा ऑक्सीजन नुकतेच दिल्लीच्या एका फाईव्ह स्टार शाळेसमोरुन जाण्याचा योग आला. शाळा सुरु होण्याची वेळ होती व त्यामुळे शाळेसमोर तोबा गर्दी होती. फाईव्ह स्टार शाळा असल्याने तेथे शिकणारी मुले मुली देखील फाईव्ह स्टार घरातीलच होती. त्यांना सोडायला आलेल्या पालकांच्या महागड्या गाड्या बघून ते सहज लक्षात येत होते. सुंदर नेटके युनीफॉर्म घातलेली मुले मुली फार गोड दिसत होते. त्यांचा तो युनीफॉर्म देखील फारच देखणा व त्याला साजेसे चमकदार शुज, छानशी बॅग आणि चेहेऱ्यावर एक गोड निरागसपणा जाणवित होता. परंतू त्यांच्या चेहेऱ्यांमधे मात्र मला एक बाब ठळकपणे खटकत होती कारण त्यापैकी कोणत्याही विद्यार्थ्याचा पूर्ण चेहेरा मला दिसत नव्हता. रुबाबात मोठाल्या गाड्यातून उतरुन आपल्या ममा नि पापाला बाय करताना ती मुले मोठी गोड दिसत होती परंतू तीच एक गोष्ट त्यांच्या त्या सबंध आकर्षक दिसण्यामधे खटकत होती. एरवी एक चांगली शाळा असा अभिप्राय मनातल्या मनात उमटवीत मी पुढे निघालो असतो परंतू या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीतली ती एक गोष्ट व त्यामागचे कारण मला जाणून घ्यायचे होते व म्हणून मी तेथे जरा घुटमळलो. तेथे येणाऱ्या पालकां...