Posts

Showing posts from July, 2017

My article about a friend whom we have lost....

सुख म्हणजे नक्की काय असतं ? त्या दिवशी बाहेरुन घरी आलो तेव्हा घरासमोर एक नवी कोरी कार होंडा अमेझ उभी होती . इतकी सुंदर दिसणारी कार जी जाहिरातीत बघीतली होती ती माझ्या घरासमोर उभी होती . घरात जाण्याआधी मी त्या कारचे निरीक्षण केले व मग ही कार घेऊन आपल्याकडे कोण आले याचा विचार करीत घरात गेलो . घरात माझा जिवलग मित्र गणेश आलेला होता . मला बघुन त्याला काय बोलावे ते सूचत नव्हते . निखळ आनंदाने त्याचा चेहरा खुलला होता . नव्या होंडा अमेझची चावी माझ्या हातात देऊन तो इतकेच म्हणू शकला , अव्या , आपली गाडी !! आपली नवी गाडी ? मी मोठ्याने ओरडलो . गण्याने गळाभेट घेतली . त्याचा चेहरा मला त्याच्या मनातील सारे भाव सांगत होता . माझ्या मनातील आनंद देखील त्याला कळत होता . त्याला बाजुला बसवून नवी गाडी चालवायला निघालो . गाडी चालविताना मी त्या गाडीच्या विशेषतांचा आनंद घेत कौतुक करीत होतो . गाडी वेगात पुढे चालली होती पण माझे मन मात्र हळूहळू मागे मागे जात होते . ते थेट जाऊन पोहोचले त