Posts

Showing posts from February, 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 25.02.20

Image
बोलघेवडी एरवी सर्वसाधारणपणे बोलघेवडी हा शब्द अकारण बडबड करणाऱ्या व्यक्तीबाबत वापरला जातो . एखाद्या सरकारवर किंवा व्यक्तीवर टिका करताना देखील हा शब्द वापरलेला आपल्याला आढळतो . वेगावेगाने व कधीकधी अतर्क्य किंवा असंविधानिक बोलणे याला देखील बोलघेवडे असणे असे संबोधतात . मुळात बोलघेवडे असणे हा बोलण्यापेक्षा व्यक्तिमत्वाचा भाग जास्त आहे असे मला वाटते . काही लोकांना बोलायला जमतच नाही त्यांना आपल्या पारंपारिक भाषेत मुगजड असे म्हणतात . याच्या अगदी उलट जे भडाभडा बोलून मोकळे होतात किंवा सहजच बोलत राहतात त्यांना बोलघेवडे संबोधिले जाते . परंतू या बोलघेवडे असण्याला देखील चांगल्या अर्थाने बघितल्या जाऊ शकते . एक झोपडी बोलघेवडी , पांथस्थाचा पाय अडे असे ना . धों . महानोरांनी एका कवितेत म्हणले आहे ते चांगल्या अर्थानेच . या बोलघेवडेपणाला आपण आधुनिक परीभाषेत सहज संवाद साधण्याची कला अवगत असणे असे देखील म्हणू शकतो . अशीच एक बोलघेवडी एका कार्यक्रमाच्या दरम्यान मला भेटली . होय बोलघेवडीच होती ती