Posts

Showing posts with the label व्यस्ततेचा ऑटीझम

थोडा है की थोडे की जरुरत है@05.03.19

Image
व्यस्ततेचा ऑटीझम खुदी को कर बुलंद याची प्रचिती मला लवकरच येणार होती !  आजकाल कोणताही कार्यक्रम आटोपल्यानंतर फोटो काढण्याचा एक स्वतंत्र कार्यक्रम असतो . बदललेल्या काळातील ती एक नवी गोष्ट आहे . कार्यक्रम झाल्यावर सर्व सहभागी लोकांसोबत फोटो काढणे आवश्यक आहे . मला ही गोष्ट छान वाटते . कारण कार्यक्रमाच्या तयारीत काही लोक नेहेमी पडद्याच्या मागे काम करतात व त्यांचा कुठे उल्लेखही होत नाही . त्यामुळे त्यांचा निदान फोटो काढल्या जाणे ही बाब खरोखरीच चांगली आहे . शिवाय कार्यक्रम झाल्याचा तो एक पुरावा देखील असतो . म्हणूनच मी देखील कार्यक्रम संपल्यावर या फोटोच्या कार्यक्रमात सहभागी होत असतो . परंतू त्या दिवशी मात्र मला तो कार्यक्रम लवकर आटोपावा असे वाटत होते कारण मला प्रचंड आश्चर्यात टाकणारा बदल दर्शविणारी माझी वर्गमैत्रीण माझी वाट बघत होती . त्यापेक्षाही जास्त मला तिच्याशी बोलण्याची वाट होती . जेवणाच्या वेळी मात्र मी आयोजकांना सांगितले की मला माझ्या वर्गमैत्रीणीशी निवांत ...