थोडा है थोडे की जरुरत है @ 23.11.21
मोहक सहजता आधुनिक काळात जे वेगवेगळे बदल होते आहेत ना त्यामधला एक चांगला बदल म्हणजे एकूणच व्यावहारिक जीवनामधे येणारी सहजता . ही सहजता कामांचे सारे स्वरुपच बदलून टाकते व कामाचा ताण कमी करयाला देखील मदत करते . नव्या पिढीने तर ही सहजता फारच लवकर स्विकारली आहे किंबहुना त्यांचा तो ट्रेंडच झाला आहे . परंतू आधीच्या पिढीच्या ज्या लोकांनी ही सहजता स्विकारण्याचा प्रयत्न केला त्यांना अनेक गोष्टी सोयीच्या होत आहेत आणि नव्या पिढीसोबत काम करणे देखील त्यांना सोयीचे जाते आहे . व्यावहारिक जगतातील अनेक वर्षे जोपासल्या किचकट परंपरा आता कालबाह्य झालेल्या असून तंत्रज्ञानासोबत बागण्या बोलण्यामधेही आलेली अनौपचारिक सहजता फार मोहक वाटते . केवळ ती स्विकारण्यासाठी मानसिकता तयार होण्याची आवश्यकता आहे . अश्या मोहक सहजतेचा मला नुकताच अनुभव आला . ॲपल कंपनीचे एक घड्याळ मी नुकतेच विकत घेतले . त्याचा वापर सुरु केला असता मला त्यामधे एक छोटी समस्या आढळली . म्हणून मी त्यांच्या कस्टमर सर्वीस सेंटरल...