Posts

Showing posts with the label विलग होणारी कलाकृती

थोडा है थोडे की जरुरत है @04.0918

Image
विलग होणारी कलाकृती .. ज्या कवितांची गाणी होतात ती गाणी आपल्या लक्षात राहतात कारण एरवी कविता लक्षात ठेवणे जरा कठीण बाब असते . बालपणीच्या कविता आपल्यापैकी अनेकांना स्मरतात कारण त्या काळी कविता वाचन , पठण हा सारा आनंदाचा भाग होता . दुर्दैवाने आता बालकवींची एखादी सुंदर कविता परीक्षेतील गुणांपर्यंत मर्यादित असल्याने त्या कवितांना अभ्यासणे व त्यांच्या गर्भीतार्थापर्यंत पोहोचणे हा प्रकार दुर्मिळ होत जातो आहे . कवितेचे स्वरुपही एखाद्या गाण्यासारखेच असते . एखादे गाणे जे दस्तुरखुद्द लताबाईंनी गायले असेल तर त्याचा आनंद शब्दातीत आहे . परंतू तेच गाणे पुढे श्रेया घोषाल म्हणते , मग तेच गाणे एखाद्या गायनाच्या स्पर्धेत एखादी लहानगी पोर गाते व तेच गाणे आपण देखील गुणगुणत असतो . या सर्व वेळी देखील आनंद मिळालेलाच असतो . कलाकृतीचे असेच असते . कोणतीही कलाकृती ही तिच्या निर्मात्यापासून कधी ना कधी विलग होते व नंतर खरे तर त्या निर्मात्याचा त्यावरचा अधिकार संपलेला असतो . जोवर ती कलाकृती न...