Posts

Showing posts from February, 2022

थोडा है थोडे की जरुरत है @ 28.02.22

Image
हिशोब आज मी एवढ्या दिवसांचा हिशोब पूर्ण केला . माझा मित्र मला फोनवर मोठ्या आनंदात सांगत होता . आज कसे मनातून छान वाटतेय . एवढे दिवस ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो त्याची पूर्तता आज झाली . इतकी वर्षे वाट बघणे सोपे काम नाही परंतू मी वाट बघितली आणि मला आज ती संधी बरोबर मिळाली . म्हणतात ना की देव बरोबर प्रत्येकाला कर्माची फळे दतो . पण या ठिकाणी मात्र मी ते घडवून आणले . एवढे दिवस मनात साठवलेल्या अपमानाचा आज मी हिशोब चूकता केला . आज कळेल त्यांना की एखाद्याच्या आयुष्याशी खेळणे कसे वाईट असते . आज त्यांच्या लक्षात येईल की चुकीच्या कामाची शिक्षा मिळतेच . मोठ्या तावातावात माझ्या मित्र मला त्याने चुकत्या केलेल्या हिशोबाबद्दल बोलत होता . त्याच्या बोलण्यात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत होता . हिशोब चुकता केला असे तो तोंडाने म्हणत असला तरी देखील त्याच्या बोलण्यातील भावांमुळे मला कळत होते की त्याने बदला घेतला . मला तो सांगत होता … साधारण पंचेवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आह