थोडा है थोडे की जरुरत है @13.02.18
बातों बातों मे .. रेल्वेच्या डब्यात बसवून दिल्यावर काकुंच्या मुलाने त्यांचा निरोप घेतला . आईला सर्व सूचना देऊन तो घरी गेला . गाडी सुरु झाली . त्या कंपार्टमेंटमधे साधारण चित्र नेहेमीप्रमाणेच होते . प्रत्येकजण आपआपल्या छोट्याश्या वर्तुळात गुडुप झाला होता . कुणी पुस्तकात डोके घातले , कुणी थेट बर्थवर चढून झोपी गेले , कुणी कानात इयरफोन टाकून गाणे ऐकू लागले तर कुणी मोबाईलशी खेळू लागले . एकंदरीत प्रत्येकाने प्रवासामधील वेळे साठी आपआपला मार्ग शोधला होता . अगदी स्वतंत्रपणे . थ्री टायर एसीच्या त्या कंपार्टमेंटमधे काकू मिळून आम्ही आठ लोक होतो . त्यामधे एक जोडपे होते ज्यांची एक चार वर्षांची गोड मुलगी देखील होती . गाडी सुरु झाल्याच्या अवघ्या दहाव्या मिनीटाला त्या काकुंनी समोर बसलेल्या साधारण त्यांच्याच वयाच्या काकांशी संवाद सुरु केला . अगदी सहजपणे .. मुलगा स्टेशनवर सोडायला आला होता हा धागा त्यांनी पकडला व त्याचाच आधार घेऊन बोलणे सुरु केले . सहजच त्यांनी संवाद सुरु केला आणि केवळ अर...