Posts

Showing posts with the label महालक्ष्मीचा प्रसाद

थोडा है थोडे की जरुरत है @ 18.09.18

Image
महालक्ष्मीचा प्रसाद महालक्ष्मी पुजनाच्याच दिवशी माझ्या मुलीला पुण्याला जायचे होते . सकाळी घरी पुजन करुन आणि त्यानंतर प्रसाद घेऊन ती सायंकाळी बसने जाणार होती . तिला सोडण्यासाठी मी खाजगी बसच्या स्टॉपवर गेलो . गाडीला जरा उशीर होता . मी आपले माझ्या सवयीनुसार आजुबाजुला सुरु असलेल्या गोष्टींचे निरीक्षण करीत उभा होतो . महालक्ष्मीचा सण यावेळी आठवडा संपताना आला असल्याने गाव सोडून परगावी राहणारी अनेक मंडळी उद्यापासून सुरु होणाऱ्या आठवड्याचा पहिला दिवस पकडण्याकरीता परत निघाली होती . खाजगी बसचालकांसाठी आजचा दिवस म्हणजे सुकाळ होता . आजच्या दिवशी त्यांनी भाडे वाढवून सांगितले तरी लोक ते द्यायला तयार असतात व म्हणून त्यांनी सर्वांनी नेहेमीपेक्षा काही जादा गाड्या देखील सोडल्या होत्या . एकंदरीत खाजगी बस प्रवास व्यवसायाशी निगडीत सारेच लोक आजच्या दिवशी फारच व्यस्त होते . परंतू या व्यस्ततेमुळे त्यांना कधी कधी काही महत्वाच्या गोष्टींना मुकावे लागते . असाच एक माणूस व त्याचा परीवार मला दिसल...