Posts

Showing posts from February, 2023

थोडा है थोडे की जरुरत है

Image
शब्दांच्या आड लपलेला भाव हाडांच्या डॉक्टरच्या दवाखान्यात शिरतानाच एक मित्र व वहिनी समोर बसलेल्या दिसल्या . माझ्यासोबत माझ्या बायकोला लंगडताना बघून मित्र म्हणाला , अरे ! अजुनही संपलेच नाही का तुमचे नाटक ? त्याचे ते वाक्य ऐकून वहिनी एकदम म्हणाल्या , काहीही काय बोलता हो ? ती काय नाटक करतेय का ? तो संवाद तेथेच संपला कारण मित्राला डॉक्टरांच्या केबीनमधे जावे लागले . आमचे काम आटोपल्यावर घरी परतताना त्या मित्राचा पुन्हा फोन आला . तो मला म्हणाला , यार ! मघाशी मी वहिनींना एकदम नाटक वगैरे म्हणालो पण मी आपल्या नेहेमीच्या भाषेत आपण मित्राला वगैरे विचारतो तसेच वहिनींना विचारले . त्यांना वाईट वाटले असेल तर तू समजावून सांग , माझी भाषाच तशी आहे . त्यांना दुखविण्याचा हेतू नव्हता . गैरसमज नको व्हायला . मी त्याला म्हणालो , काळजी करु नको . गैरसमज वगैरे काही होत नाही . तिला माहित आहे . अश्या भाषेची तिला सवय आहे . तू पण गेटच्या आतला आहेस आणि गेटच्या आतील एक व्यक्ती आमच्या पण घरी आहे . काळजी

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.02.23

Image
पत्थरोंका दर्द एक फार सुंदर गाणे इतक्यातच ऐकण्यात आले . पॅपॉन या गायकाने हे गाणे गायले असून विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली याचे संगीत या गाण्याला आहे . गाणे पहिल्यांदा जेव्हा मी ऐकले तेव्हा त्या गाण्याच्या मी प्रेमातच पडलो . गाण्याची धून , गायकाचा आवाज यासोबत माझ्या मनात राहीले ते या गाण्याचे शब्द . खरोखरीच गीतकार गीत किंवा कविता लिहीताना सभोवतालच्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण करून भावना व्यक्त करतात . त्यांनी लिहीलेल्या भावना बरेचवेळा आपल्याच असतात किंवा इतरांमधे आपल्याला त्या आढळतात . गाण्याच्या सुरुवातीलाच असे लिहीले आहे , दर्द पत्थरोंको भी होता होगा ,  किसी को क्या पता चुपके चुपके समंदर भी रोता होगा ,  किसी को क्या पता त्या दिवशी समीरच्या आग्रहाखातर मी त्याच्या सोबत जेवायला गेलो . त्याचा आग्रह होता की मी त्याच्या सोबत जेवण घ्यावे . जेवण हे केवळ निमित्त होते . त्याला मुळात काहीतरी बोलायचे होते . जेवण करताना सुरुवातीला शिळोप्याचा गप्पा सुरु होत