Posts

Showing posts with the label आऊट ऑफ सिलॅबस

थोडा है थोडे की जरुरत है @ 04.05.21

Image
आऊट ऑफ सिलॅबस शिक्षण क्षेत्रात कार्य करणारे एक प्राध्यापक एका चर्चेमधे सध्याच्या शिक्षणाच्या खेळखंडोब्याबद्दल फारच चिडले होते . गेल्या एक वर्षापासून देशात सुरु असलेल्या अनेक चर्चांमधे शिक्षणाची झालेली अस्ताव्यस्त स्थिती यासंदर्भात बोलले जातेय . अगदी टेलीव्हीजनवरील चर्चांपासून ते व्हॉट्स ॲपवरील जोक्स पर्यंत याबाबत बोलले जातेय . पण त्या दिवशी त्या चर्चेमधे आमचे प्राध्यापक बंधू फारच चिडले होते . कोरोना संक्रमण सुरु झाल्यापासून सर्वात जास्त हानी कोणत्या क्षेत्राची झाली तर ती शिक्षण क्षेत्राची असे त्यांचे म्हणणे होते . अर्थात त्यांच्या बोलण्याला ते संदर्भासहीत स्पष्ट देखील करीत होते . शाळांपासून ते विद्यापीठापर्यंत परीक्षांचे बदललेले स्वरुप , बऱ्याच विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रमोशन , नुकतीच रद्द झालेली दहावीची परीक्षा , अधांतरी असलेली बारावीची परीक्षा , तंत्रज्ञानाचा वापर करुन घेण्यात येणाऱ्या विद्यापीठीय बहुपर्यायी परीक्षा , त्या परीक्षांचा स्तर , त्यामधे विद्यार्थी मिळवित असलेले ...