Posts

Showing posts with the label राज्यगीत

थोडा है थोडे की जरुरत है @ 09.05.23

Image
राज्यगीत चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजणार असा संदेश आला . हॉलमधील सर्वजण उभे झाले . राष्ट्रगीताच्या गायनानंतर चित्रपट सुरु झाला . एका शाहिराच्या जिवनावरचा चित्रपट . तो कदाचित एखाद्या माहितीपटासारखाच असेल असे वाटले होते . परंतू अत्यंत रंजकतेने चित्रपटाची कथा पुढे सरकत राहीली . शाहिर हा आपल्या गायन सामर्थ्यामधून कश्याप्रकारे समाजप्रबोधन करु शकतो याचे वर्णन शाहीर साबळेंच्या जीवनावरील या चित्रपटातून केदार शिंदेने फारच उत्तम प्रकारे मांडले आहे . चित्रपट संपतानाचा प्रसंग . अत्यंत प्रभावीपणे व अजय अतुलच्या संगीतामधे बांधलेले गीत गर्जा महाराष्ट्र माझा सुरु झाले . आता मात्र थिएटर मधले काहीच जण उभे झाले . आम्ही जे काही मोजके उभे होतो ते देखील हळू हळू उभे झालो . बरे वाटेल का ? लोक काय म्हणतील ? असे प्रश्न कदाचित मनात असतील . गाणे संपेपर्यंत हे लोक कशाकरीता उभे झाले आहेत याबद्दल कुजबुज सुरु झाली होती . गाणे अजय गोगावलेच्या आवाजातून थेट शाहीर साबळेंच्या आवाजात कधी पोहोचले ते...