Posts

Showing posts with the label फितरत

थोडा है थोडे की जरुरत है

Image
फितरत फितरत या शब्दाचा अर्थ स्वभाव असा होतो . कधी कधी हा शब्द नकारात्मक स्वभाव दाखविण्या करीता देखील वापरला जातो . परंतू मुळात या शब्दाचा अर्थ स्वभाव असाच आहे . कोणत्याही माणसाच्या जीवनाबद्दल सांगत असताना आपण त्याच्या स्वभावाबद्दल बोलत असतो . तसे जैवशास्त्रीय दृष्टीकोनातून स्वभाव नावाचा अवयव कोणत्याही मानवाच्या शरीरात आढळून येत नाही परंतू माणसाचा एकंदर जीवन प्रवास , त्याच्या जीवनाचा आलेख , त्याचे कर्तृत्व किंवा त्याचे कार्यवर्तुळ या सर्व गोष्टींना त्याचा स्वभाव कारणीभूत असतो . तसे बघितले तर माणसाचे जीवन बदलत राहते , नवनविन स्थित्यंतरे त्यात येत राहतात परंतू माणसाचा स्वभाव मात्र तसाच राहतो कारण स्वभाव ही प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख असते . व्यक्तिमत्व हे स्वभावाशी जोडलेले असेत व त्यामुळे ते कधीच बदलत नाही असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते . या स्वभावामुळेच प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही आडाखे तयार असतात . त्या स्वभावानुरूप आपण त्या व्यक्तीशी कसे वागायचे ...