Posts

Showing posts from September, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 02.10.18

Image
१० वाजताचा आनंद कार्यालयात त्या दिवशी दोन कर्मचाऱ्यांमधे वाद झाला . नेमका कशावरुन ते कळले नाही . वादावादीची कारणे नेहेमीच ठरलेली असतात . महत्वाचे म्हणजे ती सर्वच कार्यालयांमधे सारखी असतात . एक तर काम करण्याच्या पद्धतींवरुन वाद होतात किंवा जास्त काम दिले व मलाच का दिले या मुद्द्यांवरुन होतात किंवा मला काम सांगितले आणि दुसऱ्याला मात्र नाही सांगितले यावरुन होतात . या तीन महत्वाच्या कारणांवरुन वादावादी आणि तणाव निर्माण झालेला दिसतो . काम करण्याच्या पद्धती म्हणजे माझ्या मनाला पटलेल्या पद्धतीनुसार समोरच्या व्यक्तीने कार्य केले नाही तर तणाव निर्माण होतो . बरेच वेळा काम करताना ते केवळ करायचे म्हणून केले जाते व त्यामुळे कामाच्या दर्जावर त्याचा परीणाम होतो . या प्रकारच्या पद्धतीमधे काम करुन घेणारा व करणारा यांचे सुर जुळत नाहीत व मग त्याची फलश्रुती वादावादीमधे होते . यावर साधा उपाय म्हणजे काम करत असताना जर ते सर्वोत्तम करण्याची जिद्द मनात असेल व कुणीही सांगितल्यापेक्षा त