Posts

Showing posts with the label एफ-५

थोडा है थोडे की जरुरत है@14.08.18

Image
एफ - ५ दोघांचे मोठे भांडण झाले होते . तू असे कसे काय बोललास ? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती . तू सोडून कुणीही असे बोलले असते तर मी ते ऐकून घेतले असते किंबहुना घेतेच . त्यांच्या बोलण्याची मला आता सवय झालीय . परंतू तुझ्याकडून असले बोलणे मी सहनच करु शकत नाही . कारण तू असा कधीच बोलत नाहीस . माझ्या मनाला सर्वात जास्त जपणारा तू , मला सांभाळणारा तू , माझे सर्व काही तूच आणि तू असे बोलावे ? आज तू जे बोललास त्यापेक्षा जास्त वाईट बोल मी इतरांकडून ऐकलेय परंतू ते सारे मी सहन करते . तूझ्याकडून मात्र नाही . मला आज फार फार वाईट वाटलंय . रडत होती मी गेले दोन तास . वगैरे वगैरे ताड ताड ती बोलत होती आणि तो ऐकत होता . राग फार आल्याने तिने तो सारा त्याच्यावर काढला . त्याला ठाऊक होते की तिला तरी कोण होते त्याच्याशिवाय असा राग काढायला ? रडत रडत आणि रागवून बोलणे झाल्यावर ती जराशी शांत झाली . त्यानंतर तो म्हणाला , आता मी सांगू का ? तुला जसे वाटले तसे मला म्हणायचे नव्हते . मी...