Posts

Showing posts from May, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.05.18

Image
आनंद घंटा आपल्याला आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर खूप कष्ट घ्यावी लागतात असे बऱ्याच मंडळींना वाटत असते . त्यामुळे त्या समजापोटी आनंदनिर्मीतीच्या सोप्या सोप्या प्रक्रीया त्यांना ठाऊक नसतात . परंतू मुळात आनंद निर्मीतीची प्रक्रीया ही कष्ट किंवा पैसा या बाबींशी निगडीत नसून प्रवृत्तीशी निगडीत आहे . जिवनावर मनापासून प्रेम करुन वेगवेगळे क्षण साजरे करण्यासाठी त्या प्रवृत्तीसोबत कल्पकता देखील हवी असते . कारण कल्पकता असली की जिवनातील अपरीहार्य असलेली दुःखे देखील अचानक आनंदामधे परावर्तीत होऊ शकतात . त्या कल्पकतेमुळे सामान्य पद्धतीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्याही जिवनात आनंदाची बरसात होऊ शकते , त्याचे नेहेमीचे आणि तेच ते वाटणारे रुटीन आयुष्य देखील त्याला सुंदर भासू लागते व या सोबतच अशी व्यक्ती तिच्या सहवासातील इतरांनाही जीवनाचा आनंद मिळवून देऊ शकते . अश्या पद्धतीची कल्पकता , त्या कल्पकतेची गंमत आणि त्यामधून सर्व वयोगटाच्या मंडळींना मिळणारा आनंद याची सांगड घालणारी एक मजेदार गोष्ट