Posts

Showing posts with the label नकळत ओघळलेला अश्रू

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.02.22

Image
नकळत ओघळलेला अश्रू ६ फेब्रुवारी … सकाळी ८ वाजताच्या सुमारास .. अचानक टीव्हीवरील सर्वच चॅनल्स एक ह्रदयद्रावक बातमी दाखवू लागले . काही चॅनल्सवर आधल्या दिवशीच या बातमीचा अंदाज वर्तविण्यात आला होता . पण तसे काही होणारच नाही असे मनाला पक्के समजावले होते . पण यावेळी मनाच्या आशावादानेही धीर सोडला व ती बातमी खरी ठरली . तिच्या जाण्याची ती वेदनादायी बातमी शेवटी ऐकावी लागली . वेगवेगळ्या चॅनल्सवर ते ॲंकर्स क्षणाक्षणाची माहिती देत होते . तिच्या अंत्य दर्शनाला येणाऱ्या लोकांबद्दल सांगत होते . सारा कोलाहल माजला होता . मला मात्र या साऱ्या घटनेवर विश्वासच ठेवणे शक्य होत नव्हते . तिच्या शिवाय आयुष्य या गोष्टीची कल्पनाच कधी केली नव्हती . आयुष्याची पन्नास वर्षे कायम ती सोबत होती . वेगवेगळ्या वळणावर तिची साथ होती . मनातील वेगवेगळ्या भावना ज्या व्यक्त करता आल्या नव्हत्या त्या तिने सहजच व्यक्त करून दिल्या . कुणाला काही सांगायचे होते , जे शब्दात बांधणे जमले नाही ते तिने तिच्या स्वरांमधून सहज...