सैराट या चित्रपटावरील माझा समिक्षणात्मक लेख
सैराट- भानावर आणणारं येड सैराट या चित्रपटाचा शेवटचा 'तो' एक मिनीट बघितला आणि चित्रपटगृहातील बरेचजण सुन्न झाले. कोणतेही पार्श्वसंगीत नसणारा, कोणतेही संवाद नसणारा तो एक शांत मिनीट पुढील कित्येक तास अस्वस्थ करीत राहीला...त्या मिनीटापर्यंत पोहोचतानाचा चित्रपटाचा प्रवासही तेव्हडाच रंजक आहे. मध्यंतराच्यावेळी आर्ची आणि परश्या एकमेकांचा हात धरुन गावातून पळून जातात. त्यांचे तश्याप्रकारे पळून जाणे मध्यांतरातच अनेक प्रश्न निर्माण करते. आता पुढे यांचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जेव्हा हा चित्रपट पुढे सरकतो तेव्हा नागराज मंजुळे या प्रतिभावान दिग्दर्शकाने राखलेली कलात्मक विलगता वाखाणण्यासारखी आहे. दिग्दर्शक विषयाची मांडणी करीत जातो व त्यानेच लिहीलेली कथा आपल्याला वास्तवाचे भान देत देत पुढे सरकत राहते. आपल्याही नकळत आपण स्वप्नांच्या दुनियेतून व्यावहारिकतेकडे जायला लागतो. विशेषतः या चित्रपटाच्या मूळ विषयाशी संबंधित असलेला तरुण वर्ग, ज्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलाय, त्यांना देखील 'प्रेमाच्या' भावनेबद्दल व त्या तरल भावना प्रत्यक्षात आणताना साम...