थोडा है थोडे की जरुरत है @ 13.04.21
प्रतिक एकदा एका चर्चेमधे एका विषयावर बरेच बोलणे सुरु होते . चर्चा हळू हळू वादविवादापर्यंत पोहोचली . चर्चा सुरु झाली माझ्या मनगटावर मी बांधलेल्या एका लाकडी मण्यांच्या ब्रेसलेटवरुन . वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माझा मित्र मला बऱ्याच गोष्टी सांगू लागला . तो म्हणाला की बरेच वेळा तुझ्या व्याख्यानांमधे तू वैज्ञानिक दृष्टीकोन मांडतोस , अवैज्ञानिक गोष्टी आणि बुवाबाजीच्या विरोधात बोलतोस मग तुझ्या मनगटावर तू हे का बांधले आहेस ? चर्चेमधील काही मित्र माझ्या बाजूने तर काही त्याच्या बाजूने तावा तावात बोलत होते . तो पुढे म्हणाला , हे असे काही हातावर बांधणे म्हणजे अंधश्रद्धाच आहे . काहीही कारण असले तरी असे करायला नको . आपल्या या देशात शिकलेले लोकच असे करतात म्हणूनच बुवाबाजीला थारा मिळतो . या सर्व प्रकारामधे सामान्य माणसांची लूट होते . लाखो रुपये या असल्या थोतांडांमधे खर्च होतात . त्यापेक्षा हा पैसा जर वैद्यकीय सेवा निर्माण करण्यामधे लागला तर किती चांगले होईल . सध्याच्या काळात त्याची ...